महाराष्ट्राला 'लगान' ची टीम नकोय : नारायण राणे

जिल्ह्यातील देवदेवतांच्या कृपेमुळे सत्ता आली आहे.
Narayan Rane

Narayan Rane

Dainik Gomantak 

Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा गाजू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर नारायण राणे यांच्या अर्थात भाजपच्या पॅनलने विजय संपादन केला आहे. या विजयाने आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विजय संपादन केल्यानंतर नारायण राणे माध्यमांशी बोलणार आहेत. मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची चर्चा राज्यात चांगलीच रंगली होती. मात्र या विजयाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यामध्ये आमदार नितेश राणे यांना न्यालायकडून दिलासा मिळालेला नाही.

नारायण राणे म्हणाले, ''ही सत्ता माझी नसून भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. जिल्ह्यातील देवदेवतांच्या कृपेमुळे सत्ता आली आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या परिश्रमामुळे जिल्हा बॅंकेवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. सिंधुदुर्गमधील देवदेवतांचा हा विजय आहे.''

<div class="paragraphs"><p>Narayan Rane</p></div>
नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

'आता पुढील लक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापनेचं आहे. विजय संपादन करताना खऱ्या अर्थान अकलेचा वापर करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकेवर मिळालेला विजय हा सिंधुदुर्गमधील जनतेचा विजय आहे. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं आहे. 36 मतं मिळत नाहीत आणि विधानसभेची गोष्टी हे विरोधी लोक करतात. सगळ्यांना पुरुन उरलो, केंद्रापर्यंत पोहोचलो, कुठे थांबलो नसल्याचे, देखील ते यावेळी म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com