Nitesh Rane

Nitesh Rane

Dainik Gomantak 

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर न्यायालयात सुनवाणी सुरु होती मात्र आज न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
Published on

महाराष्ट्रातील राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा गाजू लागले आहे. यातच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर न्यायालयात आज सुनवाणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान नितेश राणे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane</p></div>
Sanjay Raut: कायद्याला अतिशहाणपणा शिकऊ नये; राऊतांचा राणेंना टोला

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ल्याप्रकरणी सध्या अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. दरम्यान राणे यांच्या अटपूर्व जामीनावर आज दोन्ही बाजूकडच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणी गुरुवारी निकाल देण्यात येईल, असं जिल्हा सत्र न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं. यामुळे राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार की अटक होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. मात्र न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच आमदार नितेश राणे यांना एक मोठा धक्का मिळाला आहे.

शिवाय, सिंधुदुर्गमध्ये जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकीय वादंग निर्माण झाला असताना आमदार नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. एकीकडे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला असताना त्यांना आता मतदानासाठी उपस्थित राहता येणार नाही. तब्बल 16 कोटींच्या थकीत कर्जामुळे राज्य सहकार विभागाने आमदार नितेश राणे यांना मतदानाचा अधिकार नाकारला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नितेश राणे यांना हा दुसरा मोठा धक्का आसल्याचे मानले जात आहे.

नेमकं काय आहे संतोष परब प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे संतोष परब प्रचारप्रमुख होते. परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांना चार हल्लेखोरांना अटक केली होती. संतोष परब यांनी माझ्यावर झालेल्या हल्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव नितेश राणे यांचा हात असल्याचे म्हटले होते. मात्र आमदार नितेश राणे यांचा शोध घेण्यासाठी कनकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कनकवली पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. परंतु नारायण राणे यांनी आपण कामामध्ये व्यस्त असल्याचे कारण देत कणकवली पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीला उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com