महिलांवर हात उचलणाऱ्यांचा हात खांद्यापासून वेगळा करेन : सुप्रिया सुळेंचा आक्रमक इशारा

या दरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
Supriya Sule
Supriya SuleDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: पुण्यात सोमवारी संध्याकाळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP- NCP) आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. इराणी यांच्यावर अंडी फेकण्याचा देखील प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या दरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याच कृत्याच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुण्यात मूक निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी काल सांगितले की, महाराष्ट्रातील कोणत्याही महिलेवर हल्ला करण्यासाठी हात वर करणार्‍या पुरुषाचा मी हात तोडेन, अशी ताकीद सुळे यांनी दिली आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्यावर कथित हल्ला केल्याच्या एका दिवसानंतर त्यांनी जळगावात हे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केल्याची कथित घटना सोमवारी घडली.

Supriya Sule
Viral video: 'काही जगू द्याल की नाही'; राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले

पुणे पोलिसांनी मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

"हा शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमीच महिलांचा आदर केला. यापुढे राज्यात जर कोणी महिलेला मारहाण करण्यासाठी हात वर केला तर मी स्वतः तिथे जाऊन त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करेन. त्याचा हात तोडून हातात देईल," असा इशारा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Supriya Sule
पुण्यात स्मृती इराणींविरोधात निदर्शन, अन् NCPच्या महिला पदाधिकाऱ्याला कथित मारहाण

असाच दृष्टिकोन सर्व बाबतीत घ्यावा : फडणवीस

सुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी सर्व बाबतीत समान भूमिका घ्यावी. खासदार नवनीत राणा यांच्याशी काय झाले, त्यानंतर सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत. महिलांवर हल्ला झाला तेव्हा त्या काहीच का बोलल्या नाही. पोलिसांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले तेव्हा त्या काहीच ता बोलत नाही. अशी भूमिका त्यांनी सर्वच महिलांच्या बाबतीत घ्यावा असे मला वाटते, आम्ही त्याच्या या निर्णयाचे स्वागत करू, असे विरोधी पक्षनेते फडणवीस काल बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com