पुण्यात स्मृती इराणींविरोधात निदर्शन, अन् NCPच्या महिला पदाधिकाऱ्याला कथित मारहाण

आंदोलकांना महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहचले होते
Smriti Irani
Smriti IraniDainik Gomantak 
Published on
Updated on

पुणे : पुण्यात काल संध्याकाळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP- NCP) आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. इराणी यांच्यावर अंडी फेकण्याचा देखील प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या दरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. (Demonstration against Smriti Irani in Pune)

मंत्री स्मृती इराणी सोमवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. शहरातील बाल गंधर्व रंगमंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात इराणी उपस्थित होत्या. 'अमित शाह अँड द मार्च ऑफ बीजेपी' असे या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे नाव आहे.

यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेच्या महिला सदस्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमस्थळाबाहेर ठिय्या आंदोलन करून वाढत्या महागाईवर इराणी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.

Smriti Irani
राज ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, भेटीला बोलावण्याचं नेमकं कारण काय?

याला उत्तर म्हणून कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पुणे शहर शाखेने आरोप केला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यावर हल्ला केला. कथित घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठीमधून तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केल्यामुळे काँग्रेस अजूनही आपल्यावर नाराज असल्याचा दावा इराणी यांनी केला. इराणी म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधून जन्माला आली आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची त्यांच्याविरोधातील आक्रमक भूमिका त्यांना समजते.

राष्ट्रवादीचे पुणे विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे आणि इतर निवेदन देण्यासाठी गेले असता, सभागृहातील भाजप कार्यकर्त्यांनी नागवडे यांच्यावर हल्ला केला." राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, "दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील महिला काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी महागाई आणि एलपीजी दरवाढीविरोधात निदर्शने केली. देशातील महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने पक्षाच्या महिला सदस्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना चूल व बांगड्या भेट दिल्या होत्या.

Smriti Irani
'काँग्रेसला कमकुवत करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न', महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होणार?

महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी महाविकास आघाडी मधील काँग्रेसचा मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही महागाईच्या मुद्द्यावर हॉटेलबाहेर वेगळे आंदोलन केले. "आम्ही वाढत्या किमतीच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि बाल गंधर्व सभागृहाबाहेर फलक दाखवले," असे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com