Maharashtra: अमरावतीजवळ मालगाडीच्या 20 वॅगन्स रुळावरून घसरल्या, अनेक गाड्यांचा बदलला मार्ग

Amravati Goods Train Accident: अमरावतीमध्ये (Amravti) दिवाळीच्या (Diwali) दिवशी रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे
 accident
accident Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये (Amravti) दिवाळीच्या (Diwali) दिवशी रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. येथील टिमटाळा-मालखेड रेल्वे मार्गावर रात्री उशिरा मालगाडी रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 15-20 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या. (Amravati Goods Train Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास टिमटाळा ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे 15-20 डबे रुळावरून घसरले. कोळशाने भरलेली ही मालगाडी इंजिनसह रुळावरून घसरली. ट्रेन रुळावरून घसरल्यानंतर मोठा आवाज झाला. मालगाडीचे इंजिन रुळाच्या बाजूला पडले आणि काही डबे रुळावर पडले.

 accident
Panchganga नदीच्या पुलावर 20 ते 25 गाड्या स्लीप, कार खाली सापडलेला एकजण 10 फुट फरफटत गेला
  • वळवलेले मार्ग

या घटनेनंतर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. नागपूर (Nagpur) , मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग नरखेडमार्गे वळवण्यात आले आहेत.

रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेचे (Railway) डबे रुळावरून घसरण्याचे काम सुरू आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ही घटना रेल्वेच्या नागपूर विभागातील आहे.

सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

अजनी-अमरावती

भुसावळ-वर्धा

नागपूर-मुंबई

नागपुर-वर्धा

नागपूर-पुणे

गोंदिया-मुंबई

फतेहपूरमध्ये मालगाडी रुळावरून घसरली

उत्तर प्रदेशातील कानपूर-प्रयागराज सेक्शनमधील फतेहपूरजवळील रामवा स्टेशनजवळही रेल्वे अपघात झाला आहे. येथे मालगाडीचे 29 डबे रुळावरून घसरले आहेत. यानंतर अप-डाऊन दोन्ही मार्गिका खंडित झाल्या आहेत. पण या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अपघातानंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सणासुदीच्या दिवशी प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com