Panchganga नदीच्या पुलावर 20 ते 25 गाड्या स्लीप, कार खाली सापडलेला एकजण 10 फुट फरफटत गेला

Panchganga नदीच्या पुलावर 20 ते 25 गाड्या स्लीप, कार खाली सापडलेला एकजण 10 फुट फरफटत गेला

दैव बलवत्तर म्हणून तो वाचला
Published on

पुणे बंगळूर (Pune-Banglore) महामार्गावरील पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पुलावर विचित्र घटना घडली आहे. प्रकाशाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे तब्बल 20 ते 25 गाड्या स्लीप झाल्या. यात एक दुचाकीवर स्लीप होऊन घसरला व थेट कारच्या चाकाखाली गेला. हा व्यक्ती तब्बल 10 फुट फरफटत गेला. मात्र, केवळ अन् केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. तसेच, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

Panchganga नदीच्या पुलावर 20 ते 25 गाड्या स्लीप, कार खाली सापडलेला एकजण 10 फुट फरफटत गेला
Ayodhya Deepotsav अयोध्यानगरीत अलौकिक दीपोत्सव; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पावसामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले कीडे प्रकाशाकडे आकर्षित होतात. शिरोली पुलावर प्रचंड प्रमाणात हे किडे आल्याने वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली. कीडे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावर मोठ्या संख्येने आल्याने अनेक गाड्या स्लीप झाल्या. याच वेळेत एका युवकाची दुचाकी स्लीप झाली व तो कार खाली गेला. गाडीखाली फरफटत गेल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, येथून प्रवास करताना वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे. तसेच, पावासाचा जोर कमी झाला की कीडे नाहीसे होतात असेही स्ठानिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com