महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची त्रिसुत्री होणार लागू? आरोग्यमंत्र्यांनी दिला सल्ला

महाराष्ट्रात मास्क घालणे पुन्हा अनिवार्य केले जाऊ शकते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढल्यास मास्कचा नियम लागू केला जाऊ शकतो.
Corona
CoronaDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) मास्क घालणे पुन्हा अनिवार्य केले जाऊ शकते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले की, कोरोना (Corona) संसर्गाची प्रकरणे वाढल्यास मास्कचा नियम लागू केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात बाधितांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रभावित राज्य ठरले आहे. शनिवारी राज्यात 155 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Corona Trisutri to be implemented in Maharashtra again Advice given by the Minister of Health)

Corona
श्रद्धा श्रीनाथ स्टारर 'Witness' चा फर्स्ट लूक रिलीज

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, टोपे म्हणाले की, कोविड-19 (Covid 19) प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्हाला मास्कचे नियम पुन्हा अनिवार्य करावे लागतील. लसीकरणाचा वेग वाढवणे हे आमचे ध्येय आहे आणि मुलांचे लसीकरण होईल याची खात्री करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करु.

बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकांना घरा बाहेर पडताना मास्क घालण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, 'साथीची चौथी लाट दारात येऊ नये' यासाठी खबरदारी घेणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी नुकतीच राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. ते म्हणाले होते की, 'कोविड-19 चा धोका अजून संपलेला नाहीये'. त्यांनी दावा केला होता की, 'चीनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आधीच 400 दशलक्ष लोक आहेत, जे लॉकडाऊनचा सामना करताना दिसत आहेत.'

विशेष म्हणजे कोविडची वाढती प्रकरणे पाहता अनेक राज्यांनी मास्क नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला, तर केरळमध्ये बुधवारी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. काही काळापूर्वी जेव्हा संक्रमित लोकांची संख्या कमी झाली तेव्हा निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 155 नवीन रुग्ण आढळले आणि एका रुग्णाचा त्यात मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यातील संसर्गाची प्रकरणे 78,77,732 वर पोहोचली आहेत आणि मृतांची संख्या 1,47,843 वरती पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com