Maharsahtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या गाड्या थांबवून नंबरप्लेटची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्रात देखील यावरून आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान, यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray) यांनी कर्नाटक सरकारला (Karnataka) इशारा दिला आहे.
'कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.'
तसेच, 'हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचाराने सुटायला हाव, पण, जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर मात्र मनसे काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी तयार आहे.!!
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सीमावादावर आपली भूमिका मांडली. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जुंपली असल्याचे दिसत आहे. तोंड आवरा, नाहीतर पुन्हा तुरुंगात आराम करायला जायची वेळ येईल. असा इशारा मंत्री शंभुराज देसाईं यांनी राऊतांना दिला आहे.
यावर "शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा. न्यायालये. तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे.!!" असे उत्तर राऊत यांनी दिले आहे.
सीमावादाचा मुद्दा संसदेत देखील गाजला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत या मुद्यावर भाष्य कर्नाटकचे मुख्यमंत्री दादागिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.