Maharashtra Weather
Maharashtra WeatherDainik Gomantak

Maharashtra Weather: रत्नागिरीसह 'या' जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह बरसणार सरी

येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे
Published on

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण ही उष्णतेची लाट कमी होऊन राज्यात परत पावसाच्या सारी बरसणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. (Maharashtra Rain Alert)

संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. राजस्थानसह विदर्भात देखील उष्णतेची लाट आली. गेल्या 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट काय होती. तसेच अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या झळा बसल्या. यादरम्यान तापमान तब्बल 42 अंशाच्या वर पोहोचले होते. पण, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला (Maharashtra) उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather
मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि आणि इतर 7 जणांविरूद्ध FIR

आज आणि उद्या म्हणजेच 4 आणि 5 एप्रिलला , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.तसेच या जिल्ह्यांना 6 एप्रिलला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांना देखील उन्हाळ्याच्या उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com