मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि आणि इतर 7 जणांविरूद्ध FIR

Kirit Somaiya : मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरूद्ध दाखल करणार FIR
Hasan Mushrif
Hasan Mushrif dainik gomantak
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधील अनेक नेत्यांना ईडी ची ताकद दाखवत त्यांना जेल मध्ये पाठवल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा कोल्हापूरमधील कागलचे श्रावणबाळ म्हणून ओळखले जाणाऱ्या ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला असून आता यांचा नंबर लागल्याचेच एकप्रकारे सांगितले आहे. त्यांनी आज सकाळसकाळी ट्विट वर बॉम्ब फोडताना मुश्रीफ परिवार घोटाळ्याबाबत आपण तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. (Kirit Somaiya says on twitter FIR will be Registered against Hasan Mushrif Family ₹158 Crore Fraud)

याच्याआधीही भाजपचे किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya)यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यादरम्यान त्यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांच्यावर ही त्यांच्या संताजी घोरपडे कारखान्यावर आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी पुन्हा मुश्रीफ यांना निशाणा करताना ट्विट करत, हसन मुश्रीफ परिवारावर 158 कोटींचा घोटाळयाचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ परिवार १५८ कोटींचा घोटाळा.. हसन मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध पोलिसांत FIR नोंदवण्यात येणार आहे. पोलीस चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. तर ED आणि आयकर विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी लिहलं आहे.

Hasan Mushrif
टाइमपास टोळीला काम मिळालेल पाहून बरं वाटलं; आदित्य ठाकरेंची 'मनसे'वर बोचरी टीका

दरम्यान सोमय्या यांनी 1 एप्रिल रोजी ट्विट केले होते. त्यावेळी ही त्यांनी, हसन मुश्रीफ घोटाळा म्हणत, पुणे जिल्हा न्यायाधीश श्री.एस.एस.गोसावी यांनी भारत सरकारच्या (Government of India) याचिकेची दाखल घेतली असून कंपनी कायदा, 2013 च्या कलम 447 अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा आणि जावई यांच्यासह ९ लोकांच्या विरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याचे म्हटलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com