Maharashtra Rain: कोकणसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला यलो अलर्ट

Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचा जोर कमी झाला असुन गणपतीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. पण गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. तर अन्य ठिकाणी मात्र, पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल सर्वत्र बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले आहे. गणपतीच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साह वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पांच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी (Rain) पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईसह (Mumbai) ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने नंदूरबार जिल्ह्यात हजेरी लावली आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे पाऊस झाला नव्हता. शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी आहेत.

Maharashtra Rain Updates
मुंबईच्या बिल्डरांना धास्ती, अनधिकृत इमारतींचे होऊ शकते ट्विन टॉवर: Mumbai HC

पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com