Maharashtra Politics: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदार आणि खासदारांच्या गटाला मान्यता देऊन घटनात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
राऊत म्हणाले की, 'ही कारवाई मंदिराच्या पुजाऱ्याने दानपेटी लुटावी आणि मंदिराच्या विश्वस्तांनी त्याचा घुमट तोडावा अशी आहे. राऊतांनी 'सामना'मध्ये प्रकाशित केलेल्या साप्ताहिक स्तंभात देशातील लोकशाहीच्या मंदिरातही असेच प्रकार घडत असल्याचा दावा केला. केंद्र सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला.
महाराष्ट्रात MVA सरकार कसे पडले?
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अन्य 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केल्याने गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लोकसभेतील शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात शिवसेना नेते म्हणून मान्यता दिली.
राऊत यांनी सभापतींवर घटनात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
राऊत यांनी लेखात दावा केला आहे की, 'महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सभापतींनी घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले. लोकसभेतही चित्र काही वेगळे नव्हते.' 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत पुढे म्हणाले की, 'बंडखोर आमदार आणि खासदार आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीतून मुक्त झाले आहेत.'
लोकसभेतील शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते कोण आहेत?
शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांच्या पत्राची दखल न घेता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना खासदारांच्या गटाला मान्यता दिल्याचा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. विनायक राऊत यांनी सोमवारी रात्री लोकसभा अध्यक्षांना सादर केलेल्या त्यांच्या पत्रात आपण शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे "नियुक्त" नेते असून राजन विचारे हे मुख्य व्हीप असल्याचे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.