Nitesh Rane Raid: 'आमच्या सिंधुदुर्गात काय चाललंय?' कणकवलीतल्या मटका अड्ड्यावर नितेश राणेंची 'सिंघम' स्टाईल धाड Watch Video

Nitesh Rane Raids Illegal Matka Den In Kankavli : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गजबजलेल्या बाजारपेठेत गुरुवारी दुपारी मोठा नाट्यपूर्ण प्रसंग घडला.
Nitesh Rane Raid: 'आमच्या सिंधुदुर्गात काय चाललंय?' कणकवलीतल्या मटका अड्ड्यावर नितेश राणेंची 'सिंघम' स्टाईल धाड Watch Video
Published on
Updated on

Nitesh Rane Raids Illegal Matka Den In Kankavli

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गजबजलेल्या बाजारपेठेत गुरुवारी दुपारी मोठा नाट्यपूर्ण प्रसंग घडला. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच अचानक धाड टाकत सुरू असलेल्या मटका बुकीच्या अड्ड्यावर छापा मारला. त्यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठ आणि पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास घडली.

धाडी दरम्यान महादेव रमाकांत घेवारी यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अड्ड्यावरून 1 लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका जुगार किती मोठ्या प्रमाणावर चालतोय हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Nitesh Rane Raid: 'आमच्या सिंधुदुर्गात काय चाललंय?' कणकवलीतल्या मटका अड्ड्यावर नितेश राणेंची 'सिंघम' स्टाईल धाड Watch Video
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर तरुण अभियंत्याचा अनोखा 'सत्याग्रह'; म्हणाला, 'लाखो कोटींचा निधी जातोय तरी कुठं...'

सदर छाप्यावेळी मंत्री नितेश राणे यांनी थेट पोलीस यंत्रणेवरच नाराजी व्यक्त केली. “आल्या आल्या मी तुम्हाला सांगितलं होतं, गप्प बसणार नाही. मी नावं दिली तरी काही कारवाई होत नाही. जिल्ह्यात अशा अवैध धंद्यांना कधीच चालू देणार नाही.” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं.

त्यांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच, “मी पालकमंत्री आहे म्हणून हलकं घेऊ नका. सिंधुदुर्गच्या भविष्याशी कुणालाही खेळू देणार नाही.” असा इशाराही त्यांनी दिला.

Nitesh Rane Raid: 'आमच्या सिंधुदुर्गात काय चाललंय?' कणकवलीतल्या मटका अड्ड्यावर नितेश राणेंची 'सिंघम' स्टाईल धाड Watch Video
Goa Politics: '5 वर्षे सभापतिपदावर राहून सभापती पदाची शान वाढवायची होती'! तवडकरांची भावुक प्रतिक्रिया

नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट बजावणी केली होती. “जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागेल” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. मात्र या इशाऱ्यानंतरदेखील मटका सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतरच त्यांनी थेट धाड टाकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com