Maharashtra News: महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन का साजरा केला जातो, वाचा एका क्लिकवर

21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
maharashtra hutatma smruti din
maharashtra hutatma smruti dinDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुताम्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे1960 दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याने 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din) म्हणून साजरा केला जातो.

  • महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन का साजरा केला जातो?

1960 साली संयुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) निर्मिती झाली. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकारकडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस 'महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन' म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली.

maharashtra hutatma smruti din
Pune Major Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ मोठा अपघात; 48 वाहनांचे नुकसान, 30-35 जण जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांना हुतात्मा चौकात आदरांजली वाहिली आहे.

हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता. पण सामान्यांन लोकांना महाराष्ट्रातील जनतेला मुंबई सह महाराष्ट्र हवा होता. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता.

फोर्ट भागात त्या वेळेस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोकं जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर 'दिसताक्षणी गोळ्या घाला' असे आदेश दिले होते. त्यामुळे फ्लोरा फ्लाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि पुढे वर्षभरात 107 जणांचे जीव गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com