Pune Major Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ मोठा अपघात; 48 वाहनांचे नुकसान, 30-35 जण जखमी

अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Pune Major Accident
Pune Major AccidentDainik Gomantak

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ मोठा अपघात झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले असून, 30-35 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे.

Pune Major Accident
IFFI 21 Nov Schedule: दृश्यम-2, RRR, इंडिया लॉकडाऊनसह सोमवारी इफ्फीत विविध चित्रपटांची मेजवानी

नवले पुलाजवळ तीव्र उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली. टँकरची पाठीमागून धडक बसल्याने वाहने एकमेकांवर आदळली यात 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवानांनी वाहनांत अडकलेल्या चालकासह प्रवाशांना बाहेर काढले.

Pune Major Accident
Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडकात गोव्याचा मोठा विजय; कसवणकर बंधू चमकले

नवले पुलावर (Navle Bridge, Pune) नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होताना दिसत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com