Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! सरकारने जारी केल्या गाईडलाइन्स, आता 'या' गोष्टी ठेवा लक्षात

उष्णतेची लाट पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन शिंदे सरकारने केले आहे.
Heat Wave
Heat WaveDainik Gomantak
Published on
Updated on

Heat Wave in Maharashtra: काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

ज्येष्ठ कलावंत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते.

या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले अनेक सदस्य उष्माघाताच्या आवाक्यात आले. उष्माघातामुळे तेरा जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 13 जणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राचे राजकारणही तापले आहे.

उष्माघाताने झालेल्या मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे गटानेही एकनाथ शिंदे गटावर अनेक मोठे आरोप करत सरकारला घेरले.

  • महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स

आता या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेबाबत राज्य सरकारने दुपारी मोकळ्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

राज्यात दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असेपर्यंत मोकळ्या भागात, मैदानी भागात कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • महाराष्ट्रात उष्णतेची लाट

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी राज्य सरकारने कृती आराखडा तयार केला आहे.

Heat Wave
Atiq Ahmed Death Case: अतिक-अश्रफला 'शहीद' संबोधणारे झळकले बॅनर, पोलिसांनी केली मोठी कारवाई
  • या लोकांनी घ्यावी काळजी

50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे कर्मचारी आणि मजूर यांनी या उन्हाळ्यात काळजी घ्यावी. ज्या नागरिकांना बीपी आणि मधुमेहासारखे आजार आहेत त्यांना उष्णतेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी कामाचे तास बदलले जातील.

  • शाळा-कॉलेजच्या वेळेत बदल

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गरम हवामानात कार्बोनेटेड, उच्च प्रथिनेयुक्त पेये, चहा आणि कॉफी टाळण्याचे आवाहन केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी कृती आराखड्यात या सूचनांचा उल्लेख करण्यात आला होता. कामाच्या बाबतीत सकाळ संध्याकाळ मजुरांना प्राधान्य द्यावे. उष्माघाताने त्रस्त लोकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com