Maharashtra Crisis Update: शिंदे गटाने केलेला उपसभापतींविरोधातचा अविश्वास ठराव फेटाळला

शिवसैनिक उतरले रस्त्यावर; मुंबईत कलम 144 लागू
Maharashtra Crisis
Maharashtra Crisis Dainik Gomantak
Published on
Updated on

शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दीर्घ काळ चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातीस राजकिय स्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली मात्र, या बैठकीचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने शिवसेनेत येण्याऐवजी आपला वेगळा गट केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. (Maharashtra crisis update cm Uddhav Thackeray shiv sena rebel Eknath shinde )

अशी स्थिती असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकार आणि पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बंडखोर एकनाथ शिंदे गटाने उपसभापतींविरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे बंडखोर गटाला मोठा धक्का बसला आहे. याविरोधात एकनाथ शिंदे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Crisis
'आम्ही नामर्द नाही', संजय राऊतांनी बंडखोर आमदरांना भरला दम
Rebel Eknath shinde
Rebel Eknath shindeDainik Gomantak

तर दुसरीकडे शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने मुंबईत कलम 144 लागू करावे लागले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात गोंधळ घातला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड. आपल्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचे पुणे शहर शिवसेनाप्रमुखांनी म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व बंडखोर आमदार आणि गद्दारांना अशाच कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.

Maharashtra Crisis
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'

मुंबई पोलिसांनी केला हाय अलर्ट जारी

शिवसैनिकांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सुरक्षेसाठी अधिकारी स्तरावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.दुसरीकडे, शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे गृहमंत्री, डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून 38 आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा दुर्भावनापूर्णपणे काढून घेण्यात आल्याचा आरोप केला आहे.

मुंबईत 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू

मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस उपायुक्तांची बैठक बोलावली होती. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात, खासदार, आमदार आणि महत्त्वाच्या नगरसेवकांच्या कार्यालयात व निवासस्थानी सुरक्षा तसेच कोणतेही आक्षेपार्ह पोस्टर्स किंवा बॅनर लावले जाणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येकाला CRPC च्या कलम 144 चे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश 10 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com