'आम्ही नामर्द नाही', संजय राऊतांनी बंडखोर आमदरांना भरला दम

पक्षाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती आणखी बिघडेल, असे ते म्हणाले.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पाश्वभूमीवर आज पुण्यासह अनेक भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली. त्याचवेळी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोरांना आमदारांना ठाकरी शैलीत दम भरला आहे. पक्षाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती आणखी बिघडेल, असे ते म्हणाले. एकट्या शिवसेनेतून 38 आमदार शिंदे गटात दाखल झाल्याचे वृत्त आहे. (Eknath Shinde News Uddhav Thackeray Maharashtra Politics Shivsena Sanjay Raut Update)

राऊत म्हणाले, 'अजून सुरुवात झालेली नाही. आम्ही कोणाला काही सांगितले नाही, लोक स्वतःहून कार्यालयांची तोडफोड करत आहेत.' पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील (Pune) कार्यालयावर शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आमदार (MLA) कार्यालयाची कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. गुवाहाटी येथील शिंदे कॅम्पमध्ये सावंतही उपस्थित आहेत.

Sanjay Raut
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'

आमदारांना पुन्हा घरी परतण्याचे आवाहन

राऊत यांनी बंडखोर आमदारांना घरी परतण्याचे आवाहन केले आहे. ते पुढे म्हणाले, 'ठेच खाण्याची काय गरज आहे.' त्याचवेळी, 'तुम्ही बाळासाहेबांचे भक्त असाल तर त्यांचे मंदिर बांधा,' असा इशाराही त्यांनी दिला. पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com