बायको माहेरी गेल्याचा राग, नवऱ्याला संताप अनावर, 4 चिमुरड्यांसह विहिरीत घेतली उडी; क्षणभराच्या चुकीमुळं रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली.
Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra
Jalgaon Jamod Suicide Murder Case MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथील राजुरा धरण परिसरातील एका शेतात असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून आणि मानसिक तणावातून एका पित्याने आपल्या चार निष्पाप आणि चिमुरड्या मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या सामूहिक आत्महत्या आणि हत्याकांडामुळे भाले अंजनगावसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, निष्पाप मुलांचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra
Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय किराडिया याचे त्याच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरुन वाद झाले होते. याच वादाला कंटाळून त्याची पत्नी आदल्या दिवशीच मुलांना सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय घरातील कामे करत असताना, त्याचे वडील तिथे आले. त्यांनी विजयला विचारले की, “तू स्वतः घरातील कामे का करत आहेस, तुझी पत्नी कुठे गेली आहे?” वडिलांनी विचारलेल्या याच प्रश्नामुळे विजय कमालीच्या मानसिक तणावात आला.

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra
Maharashtra Politics: अखेर मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंचे मनोमीलन! 5 जुलैला एकाच व्यासपीठावर दिसणार राज-उद्धव

घरगुती वाद आणि मानसिक अस्वस्थता इतकी वाढली की, विजयने अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. तो आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण क्षेत्रातील एका शेतातील विहिरीजवळ गेला. तिथे त्याने काहीही विचार न करता आपल्या चार चिमुरड्यांना विहिरीच्या खोल पाण्यात ढकलून दिले आणि नंतर स्वतःही उडी घेतली.

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra
Maharashtra Alcohol Price: तळीरामांना झटका! महाराष्ट्रात दारू झाली महाग, मोजावे लागणार 'एवढे' पैसे

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह पोस्टमार्टसाठी जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेत मृत्यू झालेल्या सर्वांची ओळख पटली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव विजय मुसा किराडिया असे असून, त्याच्यासोबत मृत्यू झालेल्या चार निष्पाप मुलांमध्ये 7 वर्षांचा प्रीत किराडिया, 5 वर्षांची प्राची किराडिया, 4 वर्षांची पूर्वी किराडिया आणि अवघ्या 2 वर्षांचा चिमुरडा पीयुष किराडिया यांचा समावेश आहे.

Jalgaon Jamod Suicide Murder Case Maharashtra
Maharashtra Politics: दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, "एकत्र येणं, राहणं कठीण नाही"

एका सुखी कुटुंबाचा कौटुंबिक वादातून असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण जळगाव जामोद तालुका हादरुन गेला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आपल्याच मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आणि हत्येच्या कलमांतर्गत मृत विजय मुसा किराडिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमागील इतर कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरु केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com