Maharashtra Politics: दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, "एकत्र येणं, राहणं कठीण नाही"

Raj Thackeray on Uddhav Thackeray: आमच्यातील (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आमच्यातील (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना मुलाखतीमध्ये विचारला.

Maharashtra Politics
Goa Politics: मेळाव्याला गर्दी हा केवळ दिखाऊपणा! मडगावात कमळ फुलेल अशा भ्रमात मुख्यमंत्र्यांनी राहू नये; कुतिन्होंचे टीकास्त्र

यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडणं शुल्लक आहे. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे, असं वाटत नाही; परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असं राज ठाकरेंनी उत्तर दिलं.

Maharashtra Politics
Goa Fake Resort Booking: गोव्यात रिसॉर्ट बुक करताय? थांबा! अगोदर ही बातमी वाचा, होऊ शकते आर्थिक फसवणूक

राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलंय, ते मला माहिती नाही. ते दोघे भाऊ आहेत. ते एकत्रित येणार असतील तर आमचं काही म्हणणं नाही. महाराष्ट्र हितासाठी आम्ही देखील सोबत होतो. शिवसेना कोणी हॅन्डल करायची, हा त्या दोघा भावांचा विषय आहे, असं भरत गोगावले म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com