Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

Kolhapur Mahadevi Elephant: वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे.
Mahadevi Elephant
Mahadevi ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर: ‘‘वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करेल.

नांदणी मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा ‘वनतारा’ उपलब्ध करून देईल. लोकभावनेचा आदर करून अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती ‘वनतारा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी दिली.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वनतारा संस्थेने महादेवीला नांदणी मठामध्ये ठेऊन तिच्या उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahadevi Elephant
G 20 Museum: ‘जी-२० संग्रहालया’तून होणार गोव्याच्या समृद्ध वारशाचे जतन; ऐतिहासिक स्थळे, संबंधित नकाशांचा समावेश

महादेवी हत्तीण पुन्हा मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका दाखल करण्याचे ठरवले त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाचे पालन केले. राज्य सरकारला सर्वोतपरी मदत करण्याची तयारीही वनताराने दर्शवली आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com