
G20 Museum Quepem College
पर्वरी: केपे सरकारी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने जी २० कलाकृती संग्रहालयाच्या माध्यमातून गोव्याच्या समृद्घ आणि शाश्वत वारशाचे जतन केलेले आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी केले.
शाश्वतता सेल, अर्थशास्त्र विभाग सरकारी महाविद्यालय केपे यांच्यावतीने २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या जी २० बैठकीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी सावईकर बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेंजी जॉर्ज अंबलूर आदी मान्यवर उपस्थित होते. सावईकर यांनी या संग्रहालयाचे वर्णन, कलाकृतींच्या प्रतिमा, सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक संदर्भांची माहिती दिली.
दरम्यान, भारताने २०२३ मध्ये जी-२० शिखर परिषद गोव्यात आयोजित केलेली होती. या परिषदेत वापरल्या गेलेल्या कलाकृती आणि दस्तावेज पाहण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याचा फायदा विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक यांना घेता येतो.
जी-२० शिखर परिषद २०२३ मध्ये मांडल्या गेलेल्या आणि गोव्याशी नातेसंबंध सांगणाऱ्या अनेक कलाकृतींमधून गोव्याचा वारसा प्रतिबिंबित झाला आहे. यामध्ये गोव्याचे पारंपरिक विणकाम तंत्र आणि स्थानिक समुदायाची कारागिरी दर्शवणारी कुणबी कापडापासून बनविलेली शाल, स्थानिक कारागिरांनी तयार केलेला आणि गोव्याचा टेराकोटा कमळाच्या अगरबत्तीचा होल्डर, जीआय टॅग केलेली स्पिरीटची बाटली, लाकडी जी-२० लोगो, गोव्याशी संबंधित नकाशे आणि ऐतिहासिक स्थळे यांचादेखील या संग्रहालयात समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.