Mahadevi Elephant Kolhapur
Mahadevi Elephant Dainik Gomantak

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Mahadevi Elephant Kolhapur: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महादेवी (Mahadevi) प्रकरणात कोल्हापूरकरांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे.
Published on

Mahadevi Elephant Kolhapur: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महादेवी (Mahadevi) प्रकरणात कोल्हापूरकरांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे. 'वनतारा' संस्थेच्या शिष्टमंडळाची वन विभागासोबत (Forest Department) झालेली बैठक यशस्वी झाली असून लोकांच्या भावनांचा आदर करत महादेवीला परत देण्यास वन प्रशासन (Forest Administration) तयार झाले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महादेवी स्वगृही परत येईल. अशी माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. मात्र आता त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. त्यांची ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे.

कोल्हापूरातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारा हत्ती कॅम्पमध्ये नेण्यात आले होते. वनतारा हा वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा हा महत्त्वाकांक्षी वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे.

Mahadevi Elephant Kolhapur
Kolhapur News: कोल्हापुरातील 'या' तालुक्याला व्हायचंय गोव्यात सामिल; CM प्रमोद सावंत, PM नरेंद्र मोदींना देणार निवेदन

दरम्यान, कोल्हापूरात (Kolhapur) महादेवीला पुन्हा परत आणण्याबाबत मोहीम चालवण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तमाम नेत्यांनी याबाबत आवाज उठवत नांदणी गावाला भेट दिली. यावरुन त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात रान उठवले.

Mahadevi Elephant Kolhapur
Kolhapur Accident: बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात; बस ड्रायव्हरचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी

नेमके प्रकरण काय?

नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणूकीसाठी वापर केल्याचा आरोप 'पेटा' या प्राणी संघटनेने केला. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली. विशेष म्हणजे, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली. त्यानंतर समितीने महादेवी हत्तीणीची पाहणी करुन रिपोर्ट न्यायालयात सादर केला. समितीने रिपोर्टमध्ये प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याविषयी सांगितले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर नांदणी मठाने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महादेवीला वनतारा येथे पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com