प्रवाशांनो प्रवास झाला सुलभ; महाराष्ट्राच्या रुळांवर धावणार 'वंदे भारत ट्रेन'

राज्याला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ती मुंबई ते पुणे या मार्गांवर धावणार आहे.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई ज्याला महाराष्ट्रातील (Maharashtra) रेल्वे प्रवासासाठीची मोठी चालना म्हणता येईल, राज्याला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ती मुंबई ते पुणे या मार्गांवर धावणार आहे. सेमी-हाय स्पीड ट्रेन्स ह्या भारतीय रेल्वेच्या सर्वात वेगवान गाड्या आहेत. (Made in India Vande Bharat Train to run on Maharashtra tracks soon)

Vande Bharat Train
महाराष्ट्रात मास्कसक्ती होणार का ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उत्तर

वंदे भारत गाड्या सुरू झाल्यानंतर दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 150 मिनिटे किंवा अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अद्याप तारीख निश्चित केलेली नसली तरी, दोन नवीन गाड्या 15 ऑगस्टपर्यंत सुरू होऊ शकतात.

सध्या, दोन शहरांमधील सर्वात वेगवान ट्रेन डेक्कन क्वीन, ज्याचा प्रवास तीन तास आणि 10 मिनिटांचा आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही दोन शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कारण ट्रेनमध्ये चेअर कार्स आहेत आणि त्या या मार्गावर सुरळीतपणे चालवता येतात.”

सध्या, वंदे भारत गाड्यांमध्ये बसण्याची व्यवस्था म्हणून फक्त चेअर कार आहेत आणि म्हणूनच, मुंबई-पुणे मार्ग यासाठी निवडण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालय 2023 मध्ये AC स्लीपरसह वंदे भारत ट्रेनचा टप्पा 2 सादर करणार आहे, जी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकादरम्यान सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

लवकरच देशातील रेल्वे रुळांवर नवीन डिझाइन आणि आधुनिक सुविधांसह वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची 115 कोटी रुपये खर्चून निर्मिती केली जाणार आहे. या 16 डब्यांच्या सेमी-हाय स्पीड (Semi High Speed Train) गाड्यांपैकी ऑगस्टमध्ये दोन ट्रेनची चाचणी घेतली जाईल, ज्यासाठी या गाड्या रुळांवर उतरवल्या जाणार आहेत.

Vande Bharat Train
साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण: मोहन चौहानला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

चेन्नई ICF, दर महिन्याला सुमारे 10 ट्रेन तयार करण्यासाठी झटत आहे. एफ-कपूरथला आणि रायबरेली येथील आधुनिक कोच फॅक्टरी पुढील तीन वर्षांत 400 वंदे भारत गाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com