महाराष्ट्रात मास्कसक्ती होणार का ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उत्तर

वाढत्या कोरोना संख्येवर राज्यसरकार; सर्व यंत्रणा लक्ष ठेवून
Ajit Pawar
Ajit Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या हा विषय पुन्हा वेगाने वाढत आहे. यामूळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण राज्यातील नव्या रुग्णांची संख्या एकाच दिवसात एक हजारपेक्षा अधिकने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला सुचक इशारा दिला आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल.”, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ( Once again a decision has to be taken to use the mask - Deputy Chief Minister Ajit Pawar )

Ajit Pawar
साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण: मोहन चौहानला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “कोरोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.” असेही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

आज दिवसभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 739 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी 4 फेब्रुवारीनंतर एका दिवसात नोंदवलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे मृत्यूची एकही नवीन घटना नोंदलेली गेलेली नाही. शहरात सध्या 2 हजार 970 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही वाढती रुग्ण संख्या प्रशासनाच्या काळजीचा विषय ठरत आहे.

यावेळी अजित पवार यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पत्रकारांनी राज्याचे जीएसटीचे किती पैसे बाकी आहेत, हे विचारल्यानंतर ते सांगणे रडगाणे असते का ? वस्तूस्थिती लक्षात आणून देणे चूक आहे का ?” असा थेट सवाल उपस्थित केला. तर, “ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळायला हवे यावर आम्ही ठाम आहोत. आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला हवे याची काळजी राज्यसरकार घेत आहे.” असेही अजित पवार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com