सोन्याचा मुकुट नेत्यांना द्यावा लागणार नाही; जयंत पाटील

शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच बोट धरून राजकारणात (politics) आलो आहे.
जयंत पाटील
जयंत पाटीलDainik Gomantak
Published on
Updated on

सांगली: सर्वत्र स्वतःचे फोटो प्रकाशित करून मोफत लस उपलब्ध करून दिल्याचा केंद्र सरकारने (Central Government) आव आणला आहे. मात्र इंधनावर अधिक टॅक्स लावून जनतेकडून पैसे उकळल्याची बतावणी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम (Petroleum )राज्यमंत्रीच करतात हा भाजपचा खरा चेहरा आहे. अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर केली आहे. ते महापालिकेच्या हॉस्पिटलच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोन्याचं मुकुट नेत्याने देतो म्हणाले यावर पाटील म्हणाले. सोन्याचा मुकुट (Gold crown) त्यांना द्यावा काही लागणार नाही. त्यामुळे घोषणा करायला काय जाते. अशी टीका पाटील यांनी केली.

जयंत पाटील
पाकिस्तानला नुसती धमकी देऊन चालणार नाही, त्यासाठी सर्जिकल स्ट्राईकची ही गरज

सत्ता गेल्यानंतर काही लोकांच्या मध्ये ब्राविष्ठ पणा येतो. आणि काही लोकांचा तोल जातो. आता चंद्रकांत पाटील यांचे काय झाले आहे. ते पाहावे लागेल. एकेरी भाषा वापरणे याला काही संस्कृती म्हणत नाहीत. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच बोट धरून राजकारणात आलो आहे. असे म्हणाले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी खाजगी मध्ये नरेंद्र मोदी यांना एकेरी भाषा वापरली असावी,असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com