पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कोकण रेल्वेची भेट, गोव्यासाठी वांद्रे-बोरिवलीवरुन 'सिंधू एक्स्प्रेस'चा प्रस्ताव: Reports

Konkan Railway Updates: गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर नवी रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कोकण रेल्वेची भेट, गोव्यासाठी वांद्रे-बोरिवलीवरुन 'सिंधू एक्स्प्रेस'चा प्रस्ताव: Reports
konkan railwayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway Updates

रेल्वेने तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर नवी रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.

आता प्रवाशांची (Passengers) ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. मडगाव ते वांद्रे टर्मिनस अशी आठवड्यातून दोन दिवस धावणारी नवी रेल्वे गाडी सुरु करण्यात येईल, अशी चिन्हे आहेत. ही गाडी सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

गाडीचा प्रस्ताव आणि आराखडा कोकण रेल्वेकडून 21 ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. अद्याप रेल्वे अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

नवीन रेल्वे गाडीचा मार्ग हा बांद्रा – बोरिवली – वसई – रोहा – मडगाव असा असणार आहे. या गाडीला एकूण 20 LHB स्वरुपाचे डबे असणार आहेत. कोकण रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, नवीन गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच मंगळवार आणि गुरुवार सकाळी 7. 40 वाजता मडगाव (Goa) येथून सुटेल आणि वांद्रे (Maharashtra) येथे रात्री 23.40 वाजता पोहोचेल.

तर वांद्रे येथून ही गाडी दर बुधवारी आणि शुक्रवारी पहाटे 6.50 वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री 22.00 वाजता पोहोचेल. दरम्यान, गाडी कोणत्या स्टेशनला थांबणार हे अजून प्रस्तावात नमूद करण्यात आलेले नाहीये. मात्र सध्या गाडीचे वेळापत्रक पाहता दिवा सावंतवाडी एक्सप्रेस या गाडीच्या धर्तीवर थांबे मिळू शकतात.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कोकण रेल्वेची भेट, गोव्यासाठी वांद्रे-बोरिवलीवरुन 'सिंधू एक्स्प्रेस'चा प्रस्ताव: Reports
Konkan Railway Explained: भर पावसातही 680 कर्मचाऱ्यांचे पेट्रोलिंग; यंदा मान्सूनमध्ये रेल्वेचा प्रवास निर्विघ्न का होतोय?

दुसरीकडे, कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) अधिकाऱ्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सध्या कोकण रेल्वेकडून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे प्राथमिक प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे समजते. तिन्ही विभागांनी परवानगी दिल्यानंतर अथवा बदल सुचवल्यानंतर अंतिम प्रस्ताव पाठवला जाईल, असंही समजतंय. या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे अस्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com