
Konkan Railway Disruption Overhead Wire Fault Trains Delayed
कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी (22 मार्च) वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा बसला. रत्नागिरी ते राजापूरदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे या मार्गावरील 11 गाड्यांना मोठा फटका बसला. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक विस्कळीत झाली. मात्र प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलमदरम्यान धावणारी मंगला एक्सप्रेस वेरवली येथे पोहोचली असता गाडीचा पॅन्टोग्राफ ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेत अडकल्याने ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे मडगाव-मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह 11 गाड्या मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडल्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला.
दरम्यान, कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली. या वाहतूक कोंडीमुळे अडकून पडलेली राजधानी एक्सप्रेस पहिल्यांदा रवाना करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांना थोडसं हायसं वाटलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.