Konkan Railway: विनातिकीट प्रवाशांना मोठा झटका! 'कोकण रेल्वे'ने वसूल केले तब्बल 12.81 कोटी

Konkan Railway: कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत रेल्वे प्रशासनाने एकूण ५,४९३ विशेष मोहिमा राबवल्या.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत रेल्वे प्रशासनाने एकूण ५,४९३ विशेष मोहिमा राबवल्या. या तपास मोहिमांदरम्यान तब्बल १.८२ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करत कोकण रेल्वेने १२.८१ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे.

केवळ ऑक्टोबर २०२५ महिन्यातच कोकण रेल्वेने ९२० तपास मोहिमा राबवल्या, ज्यामध्ये ४२,६४५ प्रवासी विनातिकीट आढळले. या प्रवाशांकडून तब्बल २.४० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Konkan Railway
Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा नियमित मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करतात तेव्हा रेल्वेला केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर इतर प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने डिजिटल तिकिट बुकिंग, ऑटोमॅटिक टिकीट व्हेंडिंग मशीन आणि मोबाईल अॅप्ससारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीदेखील अनेक प्रवासी या सोयींचा वापर न करता विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले आहे.

Konkan Railway
Goa Tourism: दसऱ्यानंतर फिरायला जाताय? मग गोव्यातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना वैध तिकीट बाळगणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक शिस्तीचाही भाग आहे. तपासणी मोहिमा सातत्याने सुरू राहतील आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com