किरीट सोमय्या यांच्या पत्नीने संजय राऊतांच्या विरुद्ध दाखल केली तक्रार

तक्रारीत म्हटले आहे की, राऊत यांनी गेल्या महिन्यात लावलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak
Published on
Updated on

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी मेधा सोमय्या यांचा 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला होता. (Kirit Somaiya's wife registers complaint against ShivSena MP Sanjay Raut)

Sanjay Raut
राज ठाकरे अयोध्येत कसे येतात बघूच; बृजभूषण यांच्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षाचाही इशारा

मेधाने शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राऊत यांनी गेल्या महिन्यात लावलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत.

भाजपचे माजी खासदार सोमय्या यांच्या पत्नीने सांगितले की 15 आणि 16 एप्रिलच्या बातम्या पाहून मला धक्का बसला ज्यामध्ये राऊत यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीमध्ये 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला.

Sanjay Raut
कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स

तक्रारीत म्हटले आहे की, मीडियासमोर राऊत यांनी दिलेली वक्तव्ये बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांसमोर त्यांची प्रतिमा मलीन करणारी वक्तव्ये केली आहेत. मेधा सोमय्या यांनी कोर्टाला राऊत यांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध मानहानीची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com