Maharashtra Supermarket मध्ये वाईन विक्रीचा निर्णय ठरणार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

महाराष्ट्रामध्ये सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे या व्यवसायाला चालना मिळणार आहे.
supermarket
supermarketDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकारण तापल आहे. खरं तर शेतकऱ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे असे सरकारने सांगितले आहे. सुपरमार्केटमध्ये (Supermarket) वाईन विक्री करण्यास परवानगी मिळाली तर याचा फायदा शेतकरी (Farmers) आणि उत्पादक वर्गाना नक्की होणार असे भारतीय वाईन उत्पादक संघटनेने सांगितले आहे.

सुपरमार्केटमध्ये (Supermarket) वाईन विक्रीला करण्याच्या निर्णयामुळे नाशिकच्या उत्पादकांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मुख्य कारण म्हणजे नाशिकचे (Nashik) वातावरण वाईन बनवण्यासाठी पोषक आहे. देशातील 60 टक्क्याहून अधिक वाईन नाशिकमध्ये तयार होते. याचमुळे वाईन कॅपिटल (Wine Capital) म्हणून नाशिकची ओळख झाली आहे.

supermarket
शिविगाळ केली म्हणून मुलगा वडिलांची हत्या करू शकत नाही; न्यायालयाने फटकारले

महाराष्ट्रामध्ये ऐकून 72 वाईनरीज आहेत. यामधून वर्षभरात दोन कोटी लिटर वाईन बनवली जाते. तसेच द्राक्षांच्या वाईला अधिक मागणी आहे. यामुळे जवळपास पाच हजार एकरवर द्राक्षांचा बगीचा लावला जातो. तसेच जांभूळ, स्ट्रॉबेरी, चिकू, खजूर, संत्री, यासारख्या फळांपासून (Fruits) वाईन बनवली जाते. एक वर्षात 80 लाख लिटर वाईनची विक्री होते. परदेशात एक कोटी लिटरपेक्षा अधिक वाईन निर्यात (Export) केली जाते. या व्यवसायात पाचशे कोटींची आर्थिक उलाढाल होते. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा वाईन उत्पादकांना होणार असे भारतीय वाईन उत्पादक संघटने म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com