चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरे काय देणार उत्तर?

सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे प्रधान सल्लागार आहेत, आणि म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक मत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे.
Chandrasekhar Bavankule
Chandrasekhar BavankuleDainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे प्रधान सल्लागार आहेत, आणि म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक मत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केल आहे.

Chandrasekhar Bavankule
Maharashtra Supermarket मध्ये वाईन विक्रीचा निर्णय ठरणार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

आपल्या माजी मुख्य सचिवाने आणि विद्यमान प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल एवढी स्फोटक माहिती ईडीसारख्या जबाबदार यंत्रणेला दिली आहे. त्यानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आता आवश्यकच झाले आहे. आपल्या प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना काय उत्तर देतील?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पोलिसांच्या बदल्यांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे हस्तक्षेप करत होते. अशी कबुली राज्याचे माजी सचिव सीताराम कुंटेंनी दिली. सात डिसेंबर रोजी ईडीने कुंटे यांचा जबाब नोंदवला होता. देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा देखील आरोप आहे. कुंटे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Chandrasekhar Bavankule
शिविगाळ केली म्हणून मुलगा वडिलांची हत्या करू शकत नाही; न्यायालयाने फटकारले

सीताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे संबंधित यादीत नमूद केले असायचे, असे सांगितले होते. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या दिल्या जात होत्या. देशमुख यांच्या हाताखाली काम करत असल्यानं त्यांना नकार देऊ शकलो नाही, अशी कबुली कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात दिली. सीताराम कुंटे हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत. त्यामुळं या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com