Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Dasara And Diwali Special Trains: आगामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Diwali And Dasara Special Trains
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Dasara And Diwali Special Trains: आगामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने या दोन विशेष साप्ताहिक गाड्यांची घोषणा केली असून त्यांचे वेळापत्रक आणि थांबे जाहीर केले आहेत.

1. लोकमान्य टिळक (टर्मिनस) - तिरुवनंतपुरम उत्तर - लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक विशेष रेल्वे

गाडी क्रमांक: 01463 / 01464

वेळापत्रक:

  • गाडी क्रमांक 01463 लोकमान्य टिळक (ट) - तिरुवनंतपुरम उत्तर ही साप्ताहिक विशेष गाडी 25/09/2025 ते 27/11/2025 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 4.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:45 वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम उत्तर-लोकमान्य टिळक (ट) ही साप्ताहिक विशेष गाडी 27/09/2025 ते 29/11/2025 या कालावधीत दर शनिवारी दुपारी 4:20 वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 01:00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

Diwali And Dasara Special Trains
Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

थांबे: या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी (Ratnagiri), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जं, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटळ, मूकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापूर, उडुपी, सुराथकल, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, शोरानूर जंक्शन, त्रिशूर, आलुवा, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, चांगनशेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायंकुळम, सस्थांकोट्टा आणि कोल्लम जंक्शन या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

रचना: या गाडीला एकूण 22 एलएचबी (LHB) डबे असतील, ज्यात 1 वातानुकूलित टू टायर, 6 वातानुकूलित थ्री टायर, 9 स्लीपर, 4 जनरल, 1 एसएलआर आणि 1 जनरेटर कारचा समावेश आहे.

2. लोकमान्य टिळक (टर्मिनस) - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक विशेष रेल्वे

गाडी क्रमांक: 011179 / 01180

वेळापत्रक:

  • गाडी क्रमांक 01179 लोकमान्य टिळक (ट) - सावंतवाडी रोड ही साप्ताहिक विशेष रेल्वे 17/10/2025 ते 07/11/2025 या कालावधीत दर शुक्रवारी सकाळी 8:20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 01180 सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (ट) ही साप्ताहिक विशेष रेल्वे 17/10/2025 ते 07/11/2025 या कालावधीत दर शुक्रवारी रात्री 10:20 वाजता सावंतवाडी रोडवरुन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

Diwali And Dasara Special Trains
Mumbai Goa Car Ferry Train: चाकरमान्यांनो, गणपतीक गावाक जावचो त्रास नाय...Konkan Railway सुरू करणार मुंबई-गोवा 'कार फेरी' सेवा

थांबे: या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलाकडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

रचना: या गाडीला एकूण 22 एलएचबी (LHB) डबे असतील, ज्यात 1 फर्स्ट एसी, 3 वातानुकूलित टू टायर, 7 वातानुकूलित थ्री टायर, 8 स्लीपर, 1 पॅन्ट्री कार आणि 2 जनरेटर कारचा समावेश आहे.

Diwali And Dasara Special Trains
Konkan Railway: कोकण रेल्‍वेकडून प्रवाशांची फसवणूक! मार्गावर कमी डब्‍यांच्‍या गाड्या; तिकिटासाठी होतेय दमणूक

आरक्षण आणि नोंदणी

  • गाडी क्रमांक 01180 साठी आरक्षण (बुकिंग) 11/09/2025 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रे, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरु होईल.

  • वरील गाड्यांच्या थांबे आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

एकंदरीत, या विशेष गाड्यांच्या घोषणेमुळे मुंबई आणि कोकण तसेच केरळमध्ये दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात होणारी प्रवासाची गैरसोय टाळण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com