Konkan Railway: कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कर्नाटकच्या खासदारांचं थेट मोदी सरकारला पत्र, कारण आलं समोर

Konkan Railway: सध्या कोकण रेल्वे महामंडळाकडून कोकण रेल्वेचे संचालन केले जाते. यामुळे भारतीय रेल्वेप्रमाणे कोकण रेल्वेच्या झोनमध्ये विकास कामे करताना अडचणी निर्माण होतात.
Konkan Railway: 'कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिन करा'; दिल्लीतील बैठकीतून आली महत्त्वाची अपडेट्स
Union Railway Minister Ashwini Vaishnav & MP Kota Srinivas PujariDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वेचे लवकरात लवकर विलीनीकरण व्हावे, यासाठी कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्या कोकण रेल्वे महामंडळाकडून कोकण रेल्वेचे संचालन केले जाते. यामुळे भारतीय रेल्वेप्रमाणे कोकण रेल्वेच्या झोनमध्ये विकास कामे करताना अडचणी निर्माण होतात.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोकण रेल्वेचे (Konkan Railway) भारतीय रेल्वेत विलीनीकरणाचे निवदेन दिले. याशिवाय, त्यांनी या भेटीदरम्यान कोकण रेल्वेसंबंधी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी चर्चेदरम्यान प्रकर्षाने कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा मुद्दा रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला.

Konkan Railway: 'कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिन करा'; दिल्लीतील बैठकीतून आली महत्त्वाची अपडेट्स
Konkan Railway: वास्कोत मालगाडी रुळावरुन घसरली; कोकण रेल्वेची वाहतूक सुरुळीत सुरु

दुसरीकडे, महाराष्ट्र, गोवा (Goa) या राज्यातूनही कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत मागणी जोर धरु लागली आहे. या मागणीबाबत कोकण रेल्वेच्या उभारणीत मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रासह गोव्यातील लोकप्रतिनिधी दिल्लीत विलीनीकरणाचा मुद्दा किती प्रकर्षाने मांडतील यावर पुढील गोष्टी साध्य होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com