'मला माझ्या पतींचे स्वप्न पुर्ण करायचं आहे'

'चंद्रकांत पाटील यांनी माझी भेट घेतली होती; मात्र...'
Jayashree Jadhav
Jayashree Jadhavdainik gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मित निधणामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. तर भाजप ने आपला उमेदवार घोषित केला. त्यानंतर काँग्रेसने आपली उमेदवारी दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला देत महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले आहे. यानंतर श्रीमती जयश्री जाधव यांनी, मला माझ्या पतीचे कोल्हापूरच्या विकासासाठी राहिलेली जी स्वप्नं आहेत ती पुर्ण करायची आहेत, असे म्हटले आहे. (I want to fulfill my husband's dream says Jayashree Jadhav)

कोल्हापूर उत्तर विधानसभा दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मित निधणामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यातील राजकारण (Politics) ढवळून निघण्यास सुरूवात झाली. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही पोटनिवडणून बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र भाजपने ही पोटनिवडणुक लादली. तर शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मध्येच नॉटरिचेबल झाले. दरम्यान उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अनेक घडामोडी घडून गेल्या आणि भाजप ने आपला उमेदवार घोषित केला. त्यानंतर काँग्रेसने आपली उमेदवारी दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला घोषित करत महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी उभी असेल असे सांगत जयश्री जाधव यांना ताकद दिली. त्यामुळे उत्तर विधानसभे निवडणूकात चांगलाच राजकीय रंग चढणार आहे.

Jayashree Jadhav
अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून राणेंची हायकोर्टात धाव

यावेळी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी, कोल्हापूरच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने पती स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांची काही स्वप्ने होती, ती पूर्ण करायची आहेत. त्यासाठीच आपण निवडणूकीच्या (Election) रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांना कोल्हापूरचा (Kolhapur) विकास व्हावा यासाठी अनेक गोष्टी करायच्या होत्या. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्या गोष्टी, ती स्वप्ने आगामी काळात मी पूर्ण करणार, असल्याचे काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी सांगितले.

तसेच त्यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भेट घेतली होती. तसेच भाजपमधून निवडणूक लढावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र माझ्या पतीने जो झेंडा हाती घेतला, मला ही तोच घ्यायचा आहे. त्यांच्या स्वप्नांसाठी मी काँग्रेसमधून (Congress) उमेदवारी घेण्याचा निश्चय केला. आगामी काळात माझ्या पतीचे कोल्हापूर विकासाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com