अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून राणेंची हायकोर्टात धाव

BMC नोटीसीविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची हायकोर्टात धाव; उद्याच होणार सुनावणी
Narayan Rane
Narayan RaneDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर तोफ डागणारे नेते म्हणून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र केंद्रीय मंत्री राणे यांना मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसीने जेरेस आणले आहे. BMC ने अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून दोन वेळा राणे यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे आता नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली असून याप्रकरणी उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. (Union Minister Narayan Rane files petition in High Court against BMC notice)

Narayan Rane
Narayan Rane Press Conference: 'संजय राऊत शिवसेनेचा पगारी नेता'

मुंबईतील अधीश बंगल्यावरून सध्या भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) विरूद्ध शिवसेना तर पर्यायाने BMCयाच्यात चांगलीच लागली आहे. राणे यांच्या जुहू (Juhu) येथील या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. आता नारायण राणेंनी याा नोटीशीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. तर BMC कडून होणारी कारवाई थांबवण्यासाठी राणेंनी हायकोर्टात (HC) याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेकडे नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आली होती. ही तक्रार आरटीआय (RTI) कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. तसेच त्यांनी, Coastal Regulations Zone नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे BMC च्या पथकाने १८ फेब्रुवारी रोजी राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि नोटीसही बजावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com