ऐतिहासिक स्थळे, स्मारके होणार पर्यटकांसाठी खुली

सात महिन्यानंतर पुन्हा गड, किल्ले पर्यटकांनी (tourists) फुलणार, पुन्हा जाग्या होणार ऐतिहासिक(Historical) आठवणी.
Raigad Historical Places
Raigad Historical PlacesDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र: कोरोना प्रादुर्भाव (Covid 19 )कमी होत असल्याने रायगडातील (Raigad) ऐतिहासिक (Historical) स्थळे, स्मारके पर्यटकांस खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे गड, किल्ले, स्मारक याठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल सुरू होणार आहे. मुरुड जंजिरा किल्ला, रायगड किल्ला, कुलाबा किल्ला तसेच जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक स्थळे सात महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

केंद्राच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India)विभागाकडे जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक स्थळे, स्मारक पर्यटकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती. कोरोना नियमांचे पालन करून भारतीय (Indian)पुरातत्व सर्वेक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.

Raigad Historical Places
मोरजी किनाऱ्यावरील कचरा विदेशी पर्यटक करतात गोळा; पाहा व्हिडिओ

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके ही पर्यटनासाठी पर्यटकांना बंद केली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारक ही पर्यटनास बंद झाली होती. ऐतिहासिक पर्यटन स्थळे बंद झाल्याने याचा फटका हा स्थानिक व्यवसायिकांनाही बसला. त्यामुळे कोरोनामुळे त्याचेही आर्थिक गणित चुकले.

राज्यासह रायगडात कोरोना प्रादुर्भाव हा आटोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटनास पर्यटकांना खुली करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांनी पर्यटन करावे असेही आदेशात म्हटले आहे.

Raigad Historical Places
Goa Tourist: गोव्याची दारे खुली न झाल्याने रशियन पर्यटक इजिप्तकडे वळण्याची भीती

रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने लाखो पर्यटक हे मुरुड जंजिरा, किल्ले रायगड, कुलाबा किल्ला तसेच इतर ऐतिहासिक स्थळे, स्मारक यांना भेटी देतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला फटका बसला होता.

पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकही अडचणीत आले होते. मात्र आता पुन्हा जिल्ह्यातील गड, किल्ले हे पर्यटकांनी बहरणार आहेत. मुरुड जंजिरा किल्ला, रायगड किल्ला, कुलाबा किल्ला हे किल्ले पर्यटकांची आवडती पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटन सुरू झाल्याने पुन्हा आता गड, किल्ले यावर पर्यटक जाऊन इतिहासाच्या आठवणी जागवणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com