मुंबई : ओमिक्रॉनच्या (Omicron variant) वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कोरोना प्रोटोकॉलचे (Covid-19) पूर्णपणे पालन केले. जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या लग्नात मोजक्या लोकांना निमंत्रण दिले. आणि नोंदणीकृत लग्न केले.
मंत्र्याचा साधेपणा सगळ्यांना भावला
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशा हिचे लग्न उद्योगपती अॅलन पटेलसोबत झाले. मंत्र्याच्या मुलीचा हा विवाह केवळ नेत्यांमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. मंत्र्यांच्या या साधेपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
मात्र दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नाची एक वेगळीच चर्चा कानावर येते आहे. मुंबईत 7 डिसेंबरला अगदी साधेपणाने त्यांनी आपल्या मुलीचं लग्न केलं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन पूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर, खरंच आव्हाड यांनी आपल्या मुलीचं लग्न साधेपणाने लावलं का? की फक्त दिखावा केला अशा प्रकारची जोरदार चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे. गोव्यातील (Goa) प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये काल जितेंद्र आव्हाडांच्या मुलीच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री, मोठे कलाकार आणि परदेशातील अनेक पाहुणेमंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर आज होणाऱ्या रिसेप्शनसाठी बडी मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक राजकीय मंडळींच्या मुला-मुलींचे विवाहसोहळे मोठ्या थाटामाटत पार पडले. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने झाल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सामाजिक आणि राजकीय पातळीवर रगंत होत्या.
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह रजिस्टर पद्धतीने संपन्न झाला होता. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडाच्या या निर्णयाचे कौतुक होत होते. पण अशातच गोव्यातील ग्रँड रिसेप्शनचा व्हिडीओ समोर आल्याने अनेक पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांना कमेंट केल्या. अनेकांनी ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात विवाह केल्याच्या मुद्द्यावरुन ट्विटरवर भाष्य केलं. या टीकेला आव्हाड यांनी रात्री दहाच्या सुमारास ट्विट करून उत्तर दिलं. “काही विकृत लोकांच्या माहितीसाठी, एलन हा ख्रिश्चन असल्याने ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार गोव्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. नताशानेही स्वत:च्या इच्छेनुसार यासंदर्भात निर्णय घेतला. हे दोघे स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे,” असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून दिलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.