जर्मन नौसेनेची फ्रिगेट बायर्न F217 युद्धनौका आज मुंबईत दाखल
जर्मन नौदलाच्या (German Navy) फ्रिगेट बायर्न, F217 चे आज मुंबईत आगमन झाले. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी स्वागत केले. (German Navys Frigate Bayern, F217 arrived in Mumbai today)
दरम्यान जर्मन नौदल प्रमुख के-अचिम शॉनबॅच यांनी काल गुरुवारी भारतीय नौदल प्रमुख आर हरी कुमार यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या विषयावर चर्चा केली. शॉनबॅक यांनी भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांचीही भेट घेतली.
व्हाइस अॅडमिरल शॉनबॅक आणि अॅडमिरल हरी कुमार यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशातील नौदल सहकार्य मजबूत करण्याच्या आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्याच्या विषयांवर चर्चा करण्यात आली, असे भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.
त्याच वेळी, सैन्याने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की शॉनबॅक यांनी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांची भेट घेतली आणि या काळात द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या पैलूंवर चर्चा करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.