इंडिया गेटवर 50 वर्षांपासून जळत असलेल्या अमर जवान ज्योतीची आज बदलणार जागा

1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली होती.
Amar Jawan Jyoti flame at India Gate
Amar Jawan Jyoti flame at India Gate Twitter/@ANI
Published on
Updated on

भारताच्या राजधानी दिल्ली येथिल इंडिया गेटवर (India Gate) गेली 50 वर्षे तेवत असलेली अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) आज राष्ट्रीय युद्ध स्मारकात (National War Memorial) जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी याचे उद्घाटन केले होते. आता अमर जवान ज्योती आज दुपारी 3:30 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जळत असलेल्या ज्योतीमध्ये विलीन केली जाईल, जी इंडिया गेटपासून फक्त 400 मीटर अंतरावर आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Amar Jawan Jyoti flame at India Gate changes it position)

1914-1921 दरम्यान प्राण गमावलेल्या ब्रिटिश भारतीय सैन्यदलातील सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने इंडिया गेट मेमोरियल बांधले होते. त्याच वेळी, अमर जवान ज्योतीचा समावेश 1970 च्या दशकात भारताने पाकिस्तानवर मोठ्या विजयानंतर केला होता, ज्यामध्ये शत्रू देशाच्या 93,000 सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, नरेंद्र मोदी सरकारने इंडिया गेट संकुलात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले आणि 2019 मध्ये त्याचे उद्घाटन झाले. जिथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहेत.

Amar Jawan Jyoti flame at India Gate
5 वर्षांखालील मुलांसाठी मास्क आवश्यक नाही: केंद्र सरकार

1971 आणि त्यापूर्वी आणि नंतरच्या सर्व युद्धांमध्ये प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या नावाने तेवत असलेली ज्योत या ठिकाणी ठेवणे हीच खरी 'श्रद्धांजली' आहे, असे भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होणार

यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल आणि 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला संपेल. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. यावर्षी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी केली जाईल. 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट येथे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान करतील, अशी माहिती भारतीय अधिकाऱ्याने दिली.

Amar Jawan Jyoti flame at India Gate
दिल्लीसह 'या' राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पडणार पाऊस

कार्यक्रमासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या संदर्भात, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 20 जानेवारीपासून राष्ट्रीय राजधानीत यूएव्ही (ड्रोन्स), पॅरा-ग्लाइडर्स आणि हॉट एअर बलूनिंगसह इतर उप-पारंपारिक हवाई ऑपरेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कालपासून अंमलात झाला असून 15 फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. काही गुन्हेगारी किंवा समाजकंटक, दहशतवादी संघटना सामान्य जनता, प्रतिष्ठित व्यक्ती आणि महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी हा आदेश जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com