महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना (Shivsena) नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे घेरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष भाजपसह (BJP) राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नुकतेच बोदवड नगरपंचायत निवडणुकीदरम्यान एका निवडणूक (Election) सभेला संबोधित केले होते. जिथे त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, जे 30 वर्षे आमदार (MLA) होते त्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन रस्ते बघावेत. जर ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर हल्लाबोल केला.
गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या व्यक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले 'भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याबाबत माफी मागतो. दिवसभरातील टीकेनंतर पाटील यांनी अखेर धुळे जिल्ह्यामध्ये साक्रीयेथे बोलताना त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.