'मी आमरण उपोषण मागे घेणार नाही'... संभाजीराजे उपोषणावरती ठाम

आता जे काही असेल ते लिखित असेल असं म्हणत संभाजीराजेंनी उपोषणावरती आपले ठाम मत स्पष्ट केले आहे.
Home Minister Dilip Walse Patil And Sambhaji Raje
Home Minister Dilip Walse Patil And Sambhaji RajeDainik Gomantak
Published on
Updated on

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संभाजीराजेंची यांनी भेट घेतली. पण, त्या चर्चेच्या वेळी संभाजीराजे म्हणाले की, मी आमरण उपोषण मागे घेणार नाही. मराठा समाज रस्त्यावरती आला आहे. ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, आता चर्चेचा गेट ओपण झाला आहे. आता जे काही असेल ते लिखित असेल असं म्हणत संभाजीराजेंनी उपोषणावरती आपले ठाम मत स्पष्ट केले आहे. (Even after the visit of Home Minister Dilip Walse Patil Sambhaji Raje is adamant on fasting)

Home Minister Dilip Walse Patil And Sambhaji Raje
राज्यपालांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद मैदानावरती जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आले त्याबद्दल मी मनापासून आभारी मानतो. या बाबत गृहमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते ही सांगितले. नाशिकमध्ये आंदोलन केले होते ते मागे घेतले कारण सरकार त्यावेळी सकारात्मक होते. गृहमंत्री 100 टक्के लक्ष घालतो म्हणाले. पण आमरण उपोषण मागे घेणार नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगतो, असं म्हणत संभाजीराजे उपोषणावरती कायम आहेत.

Home Minister Dilip Walse Patil And Sambhaji Raje
दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा खंडितप्रकरणी चौकशीचे आदेश : ऊर्जामंत्री

यावर आता युद्धपातळीवरती काम करावे. मलाही त्रास व्हायला लागला आहे आणि बीपी लो झालायं. आमच्या पैकी कोणीही पक्षीय नाही आहोत. राजकीय अजेंडा काहीही नाही कोणाची सुपारी घेऊन आम्ही आलो नाही, सरकारला पण आपण वेळ देऊ, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

तर, मी लवकरात लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याशी माध्यामातून चर्चा करणार आहे. प्रश्न हे सुटलेच पाहिजेत, संभाजीराजे यांची प्रकृती अपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे, सहकार्य करावं ही विनंती आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com