राज्यपालांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

शिवाजी महाराजांचे गुरू हे रामदास नव्हते, शिवाजी महाराजांचे खरे गुरू ह्या राजनमाता जिजाऊ माता होत्या.
Bhagatsingh Koshyari Speaks on Shivaji Maharaj
Bhagatsingh Koshyari Speaks on Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला जन्म मिळाला आहे. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलं. (Bhagatsingh Koshyari Speaks on Shivaji Maharaj)

Bhagatsingh Koshyari Speaks on Shivaji Maharaj
'तेव्हाच मी जागा सोडणार...' गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आंदोलनस्थळी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केले, 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

या विधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्यावर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. समाज माध्यमांवर तर मोठ्या प्रमाणात भगतसिंह कोश्यारी यांना ट्रोल केल्या जात आहे. याच दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे चर्चांना आणखी उधाणं आलंय.

शरद पवार म्हणालेत की, जे लोक सांगतात रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू ह्या राजनमाता जिजाऊ (Jijau) माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड जर नीट अभ्यासला, तर शिवाजी महाराजांचे गुरू हे रामदास नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय. ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली आहे. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं, असं पवार एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com