Uday Bhambre Controversy: हा तर लोकशाहीवरील हल्ला! उदय भेंब्रे प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, की उदय भेंब्रे हे माजी आमदार आहेत. त्याचप्रमाणे ते एक मोठे विचारवंत अभ्यासू पत्रकार व साहित्यिक व इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत.
Yuri Alemao Support Uday Bhembre
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

LOP Yuri Alemao Support Uday Bhembre

पेडणे: पार्से येथे काँग्रेसच्या सभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ॲड. उदय भेंब्रे यांच्या घरी जाऊन केलेल्या हुल्लडबाजीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, की उदय भेंब्रे हे माजी आमदार आहेत. त्याचप्रमाणे ते एक मोठे विचारवंत अभ्यासू पत्रकार व साहित्यिक व इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. ‘ओपिनियन पोल’च्या वेळी गोव्याचे अस्तित्व टिकून रहावे यासाठी त्यांनी मोठे कार्य केलेले आहे. गोव्यासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.

उदय भेंब्रे यांच्या घरी जाऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले ते लोकशाहीविरोधी आहे. या विषयावर कुठेतरी बसून त्यांच्यासोबत चर्चा करता येणे शक्य होते, पण त्यांच्याशी केलेली ही हुल्लडबाजी निषेधार्थ आहे. भाजपच्या राजवटीत विचारवंतांचा व लोकशाहीचा गळा कशाप्रकारे दाबला जातो हे या गोष्टीवरून स्पष्ट होते, असेही आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao Support Uday Bhembre
Margao: धमकी देणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे का? उदय भेंब्रेंच्या समर्थनार्थ मडगावात सभा, संशयितांवर कारवाईची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की मडगाव येथे नामवंत विचारवंत अभ्यासू साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या घरी जाऊन बजरंग दलाच्या लोकांनी धुडगूस घातला तो निषेधार्थ आहे. भाजप सरकारच्या पाठिंब्याने जाती धर्माच्या नावावर सध्या अराजकता माजविण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरगावमध्येही मुस्लिम धर्मातील सरपंच झाला म्हणून सभा घेऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशात व गोव्यात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू धर्माला धोका निर्माण झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com