'शिवसेना-भाजपची युती पाहून बाळासाहेबही स्वर्गातून...': आमदार संतोष बांगर

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये शब्दीक युध्द सुरुच आहे.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Politics News: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये शब्दीक युध्द सुरुच आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या तारखेत बदल

बांगर म्हणाले की, 'उद्धव साहेब खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ आहेत, परंतु त्यांच्या आजूबाजूचे लोक सतत काड्या करतात.' अशा शब्दांत बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत चहापेक्षा किटली गरम असल्याचे म्हटले. त्याचवेळी शिवसेना-भाजप युती पाहून बाळासाहेबांनीही स्वर्गातून पुष्पवृष्टी केली असल्याचेही बांगर म्हणाले.

राऊत यांचे नाव न घेता निशाणा साधला

शिंदे गट आणि भाजप यांच्या सरकार स्थापनेनंतर झालेल्या बंडखोरीमुळे आमदार संतोष बांगर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी उघडपणे बोलले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेपूर्वीच्या हालचालींवरही भाष्य केले. यादरम्यान संतोष बांगर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Politics: आज महाराष्ट्रात भाजपची मोठी बैठक, 'या' तारखेला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बांगर पुढे म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक युतीतून बनले होते. या सरकारला जनतेने कौल दिला नव्हता.' परंतु आता भाजप-शिवसेना (Shiv Sena) युती झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली असेल, असेही संतोष बांगर यांनी म्हटले आहे.

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचा भाजप शासित '3G' राज्यातच मुक्काम

ठाकरेंऐवजी शिंदे यांच्या नावाचा जप

विशेष म्हणजे, एकेकाळी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव घेणाऱ्या बांगर यांनी यावेळी बोलताना सातत्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव घेतले. सुमारे पाच मिनिटे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय बांगर यांनी अनेकवेळा एकनाथ भाईंचे नाव घेतले. माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे भाई 50 कोटीहून अधिक निधी देतील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com