मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची मोठी कारवाई, 11 फ्लॅट सील

ईडीच्या म्हणण्यानुसार, या फ्लॅट्सची किंमत 6.45 कोटी आहे. 2017 मध्ये पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा (Money laundering) गुन्हा नोंदवला होता.
Sridhar Patankar
Sridhar PatankarDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक ग्रुपवर अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) मोठी कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांब्री अपार्टमेंटचे 11 फ्लॅट सील केले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, या फ्लॅट्सची किंमत 6.45 कोटी आहे. 2017 मध्ये पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा (Money laundering) गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली होती.

Sridhar Patankar
नारायण राणेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणाकर यांचा मनी लाँड्रिंग घोटाळा... बनावट कंपन्या तयार करुन करण्यात आला. घोटाळेबाजांना सोडणार नाही.

तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे हुकूमशाही आणि सूडबुद्धीचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने 6 मार्च 2017 रोजी पुष्पक बुलियन आणि त्यांच्या समूहातील इतर कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियनची 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या काळासाठी जप्त केली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीयांच्या मालकीची आहे. त्यानंतरच्या तपासातून महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी (Accommodation) यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या कंपनी मेसर्स पुष्पक रिअॅल्टीच्या निधीचे हस्तांतरण केले होते. पुष्पक रियल्टी डेव्हलपर्सने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांना विक्री, निधी हस्तांतरणाच्या नावाखाली 20 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com