Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईत भरणार दरबार; अंनिस अन् कॉंग्रेसने दर्शवला विरोध

Dhirendra Shastri: जर प्रेमळ पत्नी मिळाली असती तर ते देवावर प्रेम करु शकले नसते.
Dhirendra Shastri
Dhirendra ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

Dhirendra Shastri: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. आता पून्हा त्यांच्या कार्यक्रमामुळे राज्यात वाद-विवाद सुरु झाले आहेत. मुंबईमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावरुन हा वाद सुरु झाला आहे.

मुंबईतल्या मीरा रोडवर आजापासून बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम सुरु होणार आहे. कॉंग्रेस आणि अंनिसने या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.

आपल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकारामांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संत तुकारामांबद्दल बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले होते की त्यांची पत्नी रोज त्यांना मारत होती. पुढे त्यांनी म्हटले आहे त्यांची पत्नी त्यांना मारत होती म्हणून ते देवावर प्रेम करु शकले. जर प्रेमळ पत्नी मिळाली असती तर ते देवावर प्रेम करु शकले नसते.

Dhirendra Shastri
Sanjay Raut: संजय राऊत यांच्यासह पाचजणांवर हक्कभंग दाखल

धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केल्याच्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात होती.

धीरेंद्र शास्त्रींवर संत तुकारामांच्या पत्नीवर केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

Dhirendra Shastri
Global Millets Conference: PM मोदींच्या हस्ते ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन, टपाल तिकीट अन् नाण्यांचे केले अनावरण

दरम्यान, नागपूर( Nagpur )मध्ये जेव्हा धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा आपल्या कार्यक्रमात सांगत असलेल्या गोष्टींमधून अंधश्रद्धा पसरवत असल्याचे सांगत अंनिसने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच धीरेंद्र शास्त्रींना आरोप खोटे सिद्ध करण्यासाठी खुले आवाहन दिले होते. त्यावेळी हा वाद चांगलाच गाजला होता.

बागेश्वर धाममधून एक तरुण मुलगी गायब झाल्याची माहितीही समोर आली होती. आता मुंबई( Mumbai )मध्ये त्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाला अंनिस आणि कॉंग्रेस( Congress ) यांनी मोठा विरोध केला आहे. आता हा वाद वाढणार की इथेच थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com