Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Dainik Gomantak

देवेंद्र फडणवीस यांची धमाकेदार 'बल्लेबाजी'

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी 'केंद्रीय मंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धे'चे आयोजन केले आहे.
Published on

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भिवंडी येथे आयोजित 'केंद्रीय मंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत' खेळण्याचा आनंद लुटला. राजकीय मैदानात आपल्या शाब्दिक फटकेबाजीने विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी ओळखले जाणाऱ्या फडणविसांनी क्रिकेट (Cricket) मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी 'केंद्रीय मंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धे'चे आयोजन केले आहे.

Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, वाचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लीकवर

फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करत काही फोटो आणि खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. ते ट्विटमध्ये लिहितात, केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी यांनी भिवंडी येथे आयोजित केलेल्या केंद्रीय मंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेला काल उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना या स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि काही क्षण क्रिकेट खेळण्याचा सुद्धा आनंद घेतला'. याचबरोबर त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट वर देखील खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ बरोबर 'दे घुमाके' गाणे वाजत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com