किशोरी पेडणेकरांना फडणवीसांनी दिली 'गोवा टू मुंबई लिफ्ट'

गोव्यात विमान उपलब्ध नसल्यामुळे अडकलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फडणवीसांनी आपल्या चार्टर्ड विमानात जागा देत लिफ्ट दिली आणि सध्या तो विषय चांगलाच रंगला आहे.
Devendra Fadnavis gives Goa to Mumbai lift to Kishori Pednekar
Devendra Fadnavis gives Goa to Mumbai lift to Kishori PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय वाद आणि त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्यं, आरोप यामध्ये काही नवीन नाही. मात्र यावेळी टीकेची खालावलेली पातळी ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावणारी आहे. पण यादरम्यान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कृतीमधून पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन सर्वाना घडवलं आहे. गोव्यात (Goa) विमान उपलब्ध नसल्यामुळे अडकलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना फ़डणवीसांनी आपल्या चार्टर्ड विमानात जागा देत लिफ्ट दिली आणि सध्या तो विषय चांगलाच रंगला आहे.

Devendra Fadnavis gives Goa to Mumbai lift to Kishori Pednekar
बच्चू कडूंवरती भ्रष्टाचाराचा आरोप

विधानसभा निवडणुक 2022च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. प्रचारसभा, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान गोव्यात शिवसेनादेखील (Shiv Sena) मैदानात उतरली आहे, यानिमित्ताने किशोरी पेडणेकर गोव्यात पोहोचल्या होत्या, रविवारी घराघरात जाऊन त्यांनी प्रचार केला, याचदरम्यान त्यांना लतादीदींच्या निधनाची माहिती मिळाली.

निधनाची माहिती मिळताच किशोरी पेडणेकर तातडीने मुंबईसाठी रवाना झाल्या होत्या, यावेळी देवेंद्र फडणवीसदेखील गोव्यात असून ते चार्टर्ड विमानाने मुंबईला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी तातडीने फडणवीसांशी संपर्क साधत, लिफ्ट देण्याची विनंती केली, महापौर किशोरी पेडणेकरांची ही विनंती फडणवीसांनी मान्यही केली.

Devendra Fadnavis gives Goa to Mumbai lift to Kishori Pednekar
दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ काढणार टपाल तिकीट

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) अणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हेदेखील चार्टर प्लेननं मुंबईला आले. आणि त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईला पोहोचल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी ट्वीट करत कौतुक केले आहे. महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे असं त्या म्हणाल्या. “अचानक लतादीदी यांच्या निधनाची बातमी मिळाली, मुंबईच्या महापौर किशोरीताईंना पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती, यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या चार्टर्ड प्लेनने त्यांना गोवा टू मुंबई लिफ्ट दिली. खरंतर महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवायला हवी, असं यावेळी रुपाली ताईंनी म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे. अनेक मुद्द्यांवरुन त्यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध होत असतात. नुकतंच मुंबईतील वाहतूक कोंडीवरुन अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) केलेल्या टीकेवर किशोरी पेडणेकरांनी टीका केली होती, पण हे सर्व वाद बाजूला ठेवत फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना केलेल्या मदतीबद्दल कौतुक होतं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com