बच्चू कडूंवरती भ्रष्टाचाराचा आरोप

राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे. रस्ते निधीबाबत बच्चू कडू यांनी अपहार केला असून त्यांच्या चौकशीला परवानगी देण्याची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडे (Bhagat Singh Koshyari) करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.

Bachchu Kadu
दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ काढणार टपाल तिकीट

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. अकोला न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून जो अपहार केला त्याबद्दल न्यायालयाने बच्चू कडू सकृतदर्शनी दोषी असल्याचे निरीक्षण दिले असल्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे.

त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पाहिल्यानंतर योग्य त्या सूचना देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आली आहे.

Bachchu Kadu
एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृत्यू! बाथरुममध्ये आढळला मृतदेह

महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्ते कामात फेरफार करत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर (Jitendra Papadkar) यांचे देखील नाव याप्रकरणी समोर आले आहे.

काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन मान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी जिल्हा परिषदेला पाठवून कडू यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते, या संदर्भातील सर्व पुरावे आणि संबंधित माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली. जिल्हा नियोजन समितीने नियोजित न केलेले इ.जि.मा आणि ग्रा.मा नंबर इ-टेंडरींग मध्ये टाकून त्याकरिता आलेला निधी देखील लागोलग काढल्याचे आरोप पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावरती आहे.

या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकरभे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदविली नाही. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देखील या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. कलम 156/3 अंतर्गत जिल्हा न्यायालयात याचिका करण्यात आल्याचे देखील आंबेडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com